
प्लॅस्टिक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या मनिका प्लास्टेक लिमिटेड ही कंपनी शेअर बाजारात उतरणार असून शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. आयपीओच्या माध्यमातून 92.5 कोटींचे भांडवल उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असून शेअरची आयपीओ किंमत 40 ते 43 रुपये आहे. 16 सप्टेंबरपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे.
‘पॉलिमर पॅकेजिंग’च्या व्यवसायातील कंपनी
बॅटरी केस, कव्हर, कंटेनर्स आणि अन्य पॅकिंग साहित्याची निर्मिती करते. बिर्ला ओपस, ल्युमिनस पावरपासून अनेक मोठे ब्रँड कंपनीचे ग्राहक आहेत. आयपीओच्या माध्यमातून उभारलेले पैसे व्यवसाय विस्तार, यंत्रसामुग्री खरेदी, कर्ज परतफेड आणि अन्य औद्योगिक कामांसाठी वापरण्यात येणार आहेत, असे मुंजाल कपाडिया यांनी सांगितले.
























































