
सामना प्रतिनिधी । पणजी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव संपूर्ण सन्मानासह तिरंग्यामध्ये लपेटून फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या ट्रक मधून भाजप कार्यालयाकडे रवाना करण्यात आले आहे. भाजप कार्यालयात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन सर्वांना करता येणार आहे.
यावेळी त्यांचे मुलगे अभिजात, उत्तपल, भाऊ अवधूत आणि अगदी जवळचे कार्यकर्ते ट्रकवर सोबत आहेत. मनोहर पर्रीकर यांना भाजप कार्यालयात भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येईल.



























































