मनोज तिवारी यांना 21 हजारांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप खासदार-अभिनेते मनोज तिवारी यांना दिल्ली वाहतूक पोलिसांनी तब्बल 21 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी मनोज तिवारी हे दिल्लीतील बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मात्र दुचाकी चालवताना त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. तसेच पीयूसी प्रमाणपत्र, एसएसआरपी आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या गाडीच्या मालकालाही पोलिसांनी दंड ठोठावला आहे.