मनू-अनमोल जोडीने पटकावले मिश्र एअर पिस्तोलचे सुवर्णपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | पिझेन

झेक प्रजासत्ताकात सुरु असलेल्या २८ व्या शूटिंग होप्स आंतरराष्टीय नेमबाजी स्पर्धेत हिंदुस्थानच्या मनू भाकर आणि अनमोल जैन या हिंदुस्थानी जोडीने १० मीटर एअर पिस्तोल प्रकाराच्या मिश्र गटात सुवर्णपदकाची कामे केली. मनू-अनमोल जोडीने ४७६.९ गुणांसह हिंदुस्थानच्याच देवांशी राणा आणि सौरभ चौधरी जोडीला मागे टाकत सुवर्णपदक पटकावले.

मिश्र १० मीटर एअर रायफल सांघिक गटात हिंदुस्थानच्या श्रेया अगरवाल आणि हृदय हजारिका ( ४९६.५ ) यांनी रौप्यपदक तर एलावेंनिल वलरीवन आणि दिव्यांश सिंग पानवार (४३३.९ ) यांनी कांस्यपदक पटकावले. .या स्पर्धेत हिंदुस्थानच्या युवा नेमबाजांनी शानदार कामगिरी नोंदवत ११ सुवर्ण ,७ रौप्य आणि ६ कास्यपदके अशा २५ पदके पटकावली आहेत.मनू भाकरने स्पर्धेत ४ सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे.