टेलिग्राम नंबर 1! हिंदुस्थानात झाले सर्वाधिक डाऊनलोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जानेवारी 2021 मध्ये टेलिग्राम सर्वात जास्त डाऊनलोड होणारे नॉन गेमिंग अॅप बनले आहे. एकटय़ा हिंदुस्थानात टेलिग्रामला 24 टक्के डाऊनलोड मिळाले आहेत. सेन्सर टॉवरच्या ताज्या अहवालानुसार, टेलिग्रामचे गेल्या महिन्याभरात 6 कोटी 30 लाख डाऊनलोड आहेत.

व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीनंतर युजर्स मोठय़ा प्रमाणात टेलिग्रामकडे वळले आहेत. डिसेंबर 2020 मध्ये टिकटॉक हे जगातील सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप होते. त्यावेळी टेलिग्राम पहिल्या पाच स्थानांवरही नव्हते. मात्र जानेवारीत टेलिग्रामने मोठी झेप घेऊन रेका@र्ड केला आहे. यादीत दुसऱया स्थानावर टिकटॉक आहे. त्यानंतर सिग्नल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा नंबर लागतो.

1 ते 31जानेवारी 2021 मध्ये अॅप स्टोअर आणि गुगल स्टोअर झालेल्या डाऊनलोडवर आधारित अहवाल सेन्सर टॉवरने दिला आहे. हिंदुस्थानापाठोपाठ इंडोनेशियातून टेलिग्रामला जास्त म्हणजे 10 टक्के डाऊनलोड मिळाले आहेत.