हिंदुस्थान पाकिस्तानच्या शस्त्रसंधीमुळे अनेक माजी सैन्यप्रमुख आश्चर्यचकित, या घडामोडींमुळे नेमकं साध्य काय झालं? माजी सैन्यधिकाऱ्यांचा सवाल

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले अखेर शनिवारी दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीमुळे हिंदुस्थाने काही माजी सेनाप्रमुखांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच यातून नेमके साध्य काय झाले असा सवाल त्यांनी विचारला आहे.

माजी सैन्यप्रमुख जनरल व्हीपी मलिक यांनी एक्सवप पोस्ट करून म्हटले आहे की, 22 एप्रिलला पहलगाममध्ये हल्ला झाला. याविरोधत हिंदुस्थानने सैनिकी कारवाई केली. पण यातून काहीच राजकीय किंवा रणनीती लाभ झाला नाही. या सगळ्यात आपण काय साध्य केलं हा प्रश्न आपण आता भविष्यावर सोडला आहे.

 

माजी सेनाप्रमुख जनरल मनोज नरवणे म्हणाले की अशा प्रकारे शस्त्रसंधी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ही बाब तिसऱ्यांदा घडली आहे आणि आता पुढे अशी संधी मिळणार नाही.

पाकला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? शस्त्रसंधीवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल

नरवणे म्हणाले की समुद्र आणि आकाशातली ही सैनिकी कारवाई थांबवण्याचा निर्णय योग्य आहे. पण आपण नेहमीच अशी चूक करतो. कुठलाही हल्ला झाला की आपल्या लोकांचा मृत्यू होतो आणि आपण त्यावर प्रत्युत्तरात्मक कारवाई करतो आता ही गोष्ट चालणार नाही. हे तिसऱ्यांदा घडलंय आणि आता परत अशी संधी मिळणार नाही.

 

राजकीय विश्लेषक आणि लेखक ब्रह्मा चेलानी यांनीही या शस्त्रसंधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चेलानी म्हणाले की जेव्हा आपला विजय होणार असतो तेव्हा त्याचे रुपांतर पराभवात करण्याची आपली जुनी सवय आहे. त्यांनी काही घटनांचे उदाहरण देत म्हटलं की,2020 साली चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली होती. तेव्हा हिंदुस्थानला कैलास पर्वतावरील आपला ताबा सोडावा लागला. इतकंच नाही तर लडाखमध्ये चीनने काही बफर झोन तयार केले होते त्याला हिंदुस्थानने मान्यता दिली. आता पण हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. पण पाचव्याच दिवशी काहीही हाती न लागता हे ऑपरेशन थांबवलं असेही चेलानी म्हणाले.

काही निवृत्त सैन्याधिकांनी सोशल मिडियावर म्हटलंय की आपलं सैन्य पाकिस्तानचा नकाशा बदलण्यासाठी तयार होते पण शस्त्रसंधी झाल्यामुळे अनेकजण निराश झाले.

मोदी 200 देश फिरले, पण जगात हिंदुस्थानला मित्र नाही! इंदिरा गांधींचा उल्लेख करत संजय राऊत सरकारवर बरसले