
‘आरक्षण नाही, मी शिकू शकत नाही’ अशी चिठ्ठी लिहून ठेवत हिंगोली जिल्हय़ात आरती नागोराव शिंदे (17) या तरुणीने गळफास घेतला. या आत्महत्येला गृह मंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी नातलगांनी तरुणीचा मृतदेह उपविभागीय कार्यालयात आणून ठेवला. सायंकाळी कळमनुरी तहसीलदारांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, वसमत तालुक्यातील नहाद येथे गोविंद कावळे (21) या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली.



























































