व्हिडीओ: पुण्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, मंत्री-आमदार-खासदारांच्या घरासमोर निदर्शनं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
maratha-protest-ncp-vandana-chavan
फोटो: चंद्रकांत पालकर

सामना प्रतिनिधी । पुणे

आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या घर आणि कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येत आहे. आज पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यलयासमोर आंदोलन केल्यानंतर आंदोलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या घरावर थडकले.

वंदना चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन सुरू झाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र वंदना चव्हाण या घरी नसल्याने त्यांच्यावतीने त्यांच्या पतीने मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आपला मोर्चा राज्यमंत्री (सामाजिक न्याय) दिलीप कांबळे यांच्या घराकडे वळवला.

दरम्यान, याआधी लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाल करण्यात आलं होतं.

व्हिडीओ: चंद्रकांत पालकर