
निळी साडी, मोकळे केस अन् मादक नजर असणारी ही महिला सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तिचा हा सुंदर फोटो पाहून युजर्स ही महिला कोण हे सर्च करत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या तासात 3 लाख लोकांनी तिला सर्च केले आहे. ही दुसरी तिसरी कोणी नसून ही आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. सोशल मीडियावर @newottupdates या अकाऊंटवरुन या अभिनेत्रीचा निळ्या साडीतला एक फोटो शेअर करण्यात आला आहे. आणि त्यासोबत ग्रोक हा फोटो का ट्रेण्ड होतोय? ही महिला कोण आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यानंतर अवघ्या पाच तासात या महिलेला तीन लाख पन्नास हजार लोकांनी सर्च केले आहे. त्यानंतर या फोटोवर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
Why is this pic trending 📈 & who’s she? @grok pic.twitter.com/huAHKtVsDw
— OTT STREAM UPDATES (@newottupdates) November 9, 2025
इंटरनेटवर व्हायरल होत असलेली ही महिला म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक आहे. तिने आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती अनेक जाहिरातींमध्येही झळकली आहे. ‘तारे जमीन पर’ आणि ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.अभिनेत्री गिरीजा ओक ही कायमच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रेक्षाच्या मनावर राज्य करत असते. आता लवकरच तिची ‘थेरपी शेरपी’ ही हिंदी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



























































