
‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘अहिल्याबाई होळकर’ या मालिकांमधून ऐतिहासिक भूमिका साकारत अभिनेत्री स्नेहलता वसईकर (snehlata vasaikar) घराघरात पोहोचली.

स्नेहलता दिवसेंदिवस नवनवीन भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकत आहेत. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी सोयराबाईंची भूमिका विशेष गाजली होती.

‘अनुपमा’ या गाजलेल्या वेब सिरिजमध्येही तिने केलेली महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका विशेष गाजली होती.

विशेष म्हणजे सोशल मीडियावरील तिचा वावर वाढला असून विविध फोटो आणि व्हिडिओ ती शेयर करत असते.

नुकतेच तिने बोल्ड फोटोशूट करून घेतले आहे. फोटोमध्ये स्नेहलताने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

हटके पोझमध्ये केलेले हे फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. फोटोशूट वर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.






























































