प्रतीक्षा संपली! 11 जानेवारीपासून ‘बिग बॉस मराठी’, रितेश देशमुख करणार सूत्रसंचालन

गेल्या अनेक दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’ या रिऑलिटी शोच्या सहावा सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अखेर कलर्स मराठीने प्रोमो शेअर करून शो कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या 11 जानेवारीपासून कलर्स मराठीवर ‘बिग बॉस मराठी’ सुरू होणार आहे. त्याचे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. त्याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ‘आला रे आला, आपला भाऊ आला’ या आवाजाने प्रोमोची सुरुवात होते. ‘आता सगळे होणार बेभान. रितेश भाऊ घेऊन येत आहेत महाराष्ट्राचे तुफान!’  ‘मागचा सीझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय, आहात ना तय्यार!’ असे रितेश म्हणत आहे. काय पॅटर्न असणार? कसा लुक असणार? सदस्य कोण असणार? सगळे अजून गुलदस्त्यात आहे. सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी’च्या मागील पर्वाचा विजेता आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोण सहभागी होणार आहे, हे लवकरच समजेल.