
पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी दिलेल्या लढ्याच्या शौर्यगाथेवर आधारीत चित्रपट पावनखिंडचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. हा जबरदस्त ट्रेलर पाहून अंगावर शहारे उभे राहतील. या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी इंस्टाग्रामवरून या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली होती. त्यासोबत त्यांनी उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेलर! हर हर महादेव’’ अशी कॅप्शन शेअर केली होती.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर करत असून बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत अजय पूरकर आहेत. त्या व्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी आणि शिवराज वायचळ यांच्या देखील भुमिका आहे. हा चित्रपट येत्या 18 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.



























































