धाराशिवला होणार अ.भा. मराठी साहित्य संमेलन

238

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाचे 93 वे मराठी साहित्य संमेलन धाराशिवला होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी संभाजीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत केली. धाराशिवमध्ये संमेलन भरवावे अशी मागणी गेल्या 7 ते 8 वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेकडून करण्यात येत होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्षांनी यासाठी सर्व सदस्यांना अहवालासह परिपत्रक पाठवून त्यांची मते जाणून घेतली. विद्यमान संमेलन अध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांच्यासह 19 सदस्यांनी धाराशिवची निवड करून सुखद धक्का दिला. त्यानुसार धाराशिवची निवड झाली असल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या