इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
married-woman-commits-suicide-by-jumping-from-8th-floor-of-building

इमारतीच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास मावळ तालुक्यातील कातबी येथील व्हीटीपी अर्बन लाईफ या सोसायटीत घडली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्रतिभा मनीष शंकर (34) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

तळेगाव एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी याबाबत माहिती दिली. प्रतिभा यांचा आठव्या मजल्यावर फ्लॅट आहे. त्यांचे पती एका कंपनीत नोकरी करतात. त्यांना जुळी मुले आणि एक मुलगी आहे. प्रतिभा या शनिकारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीत आठव्या मजल्यावर लटकलेल्या अवस्थेत सोसायटीतील रहिवाशांना दिसल्या. त्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या पतीने बाल्कनीत जाऊन त्यांचा हात पकडला, मात्र प्रतिभा यांचा हात निसटला आणि त्या खाली पडल्या.