
सूर्यमालेतील मंगळ हा ग्रह आज एक कोरडा आणि धुळीने भरलेला ग्रह आहे. पण, काही अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर लाल रंगाच्या पृष्ठभागाऐवजी एक महासागर होता.
शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधानुसार 350 कोटी वर्षांपूर्वी मंगळावर हजारो वर्ग किमी परिसरात पसरलेला महासागर होता. शोरलाईन टोपोग्राफीच्या माध्यमातून हा शोध लावण्यात आला आहे. जर्नल ऑफ जियोफिजिकल रिसर्च या शोधनिबंधात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी 6500 किमीहून अधिक फ्लुवियल रिजचा एक तक्ता बनवला, जे नद्यांमुळे तयार झाले आहेत. हे रिज म्हणजे समाप्त झालेल्या रिव्हर डेल्टा किंवा सबमरीन चॅनल बेल्ट (समुद्राच्या तळाशी कोरले गेलेल चॅनल्स) आहेत.
पेन्सिल्विनिया स्टेट युनिव्हर्सिटीचे भू वैज्ञानिक बेंजामिन कर्डेनस यांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीवर काळाच्या ओघात समुद्र तळाशी तयार होणाऱ्या जलमार्गाचा एक ऐतिहासिक तक्ता बनवतो. त्याला स्ट्रॅटिग्राफी म्हणतात. मंगळाच्या भूमीवर अशाच प्रकारे शोध केला गेला. 2007मध्ये गोळा केलेल्या मंगळाच्या माहितीचा वापर करून रिजविषयी विश्लेषण करण्यात आलं. त्यानुसार, खूप वर्षांपूर्वी मंगळावरील या भागात बदल झाले. त्यामुळे समुद्राची पातळी घटण्याची आणि खडकांची हालचाल यांची नोंद झाली.


























































