गिरगाव चौपाटीवरील शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक दुर्लक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
छाया - सचिन वैद्य

सामना प्रतिनिधी । मुंबई

26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडून देत प्राणाची आहुती देणारे शहीद पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांच्या स्मरणार्थ गिरगाव चौपाटीवर प्रेरणास्थळ उभारण्यात आले आहे. हा प्रयत्न निश्चितच स्त्युत्य असला तरी त्याच्या देखभालीकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. ओंबळेंच्या अर्धवर्तुळाकार पुतळयावरील सुकलेला हार आणि स्मारकाच्या दर्शनी भागात साचलेल्या पाण्यातील शेवाळं बरंच काही सांगून aजातं. मृत्युंजय वीराच्या स्मारकाची दुरवस्था चटका लावून जाते.