शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिळणार आठ लाखांची मदत

280

युद्धात लढताना एखादा जवान शहीद झाल्यास किंवा जखमी होऊन दिव्यांगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आता सैनिक कल्याण निधीतून आठ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. आतापर्यंत केवळ दोन लाख रुपयांची मदत केली जात होती. या वाढीव मदतीला आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली.

जवान शहीद झाल्यास किंवा 60 टक्क्यांपेक्षा जादा दिव्यांगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शन, लष्करी विमा, सेना कल्याण निधी, शिवाय सैनिक कल्याण निधीतून दोन लाख रुपयांची मदत केली जात होती. त्यामध्ये वाढ करण्याची मागणी जवानांकडून वर्षानुवर्षे केली जात होती. त्याची दखल घेऊन आर्थिक मदतीचा आकडा चारपटीनी वाढवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या