राज्यातील आरोग्य सेवा कर्मचाऱयांसाठी आता रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या कर्मचाऱयांसाठी मसिना हॉस्पिटल आणि टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसने नव्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. महाआरोग्य काwशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यात जेरिऑट्रिक केअर, डिमेन्शिया केअर, होम हेल्थ एड या विषयांवर सर्टिफिकेशन कोर्सेस सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मसिना हॉस्पिटलचे सीईओ डॉ. विस्पी जोखी, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्रकल्प संचालक तन्मय नायक आणि एनजीओचे प्रकल्प सल्लागार आणि स्पर्श कन्सल्टंट्सचे व्यवस्थापकीय भागीदार विजयकुमार अय्यर यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल कॉन्फरन्स वेबिनारद्वारे या नव्या अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. हे प्रमाणपत्र सर्टिफिकेशन कोर्सेस विद्यार्थ्यांना जेरिऑट्रिक केअर, वयोवृद्ध व्यक्तींवर उपचार आणि डिमेन्शिया रुग्णांसाठी प्रशिक्षण देण्याकरिता आणि सुलभ उपचार सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य सेवा प्रणालीला सुलभ प्रशिक्षणासह सुसज्ज करण्याबरोबरच घरगुती आरोग्य सेवेचे काwशल्य वाढविण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही होम केअर सपोर्ट स्टाफची गरज असल्याचे पाहिले आहे, जिथे 65 टक्के वृद्ध त्यांच्या दैनंदिन देखरेखीसाठी इतरांवर अवलंबून आहेत. आम्ही रोजगार सक्षम करण्यासाठी आणि कुशल आरोग्य सेवा व्यावसायिक आणि सहायक कर्मचाऱयांची गरज पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी हे कोर्सेस सुरू करण्यात आले आहे.
डॉ. विस्पी जोखी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मसिना हॉस्पिटल
कोणकोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश
टिस, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आणि अल्झायमर्स अॅण्ड रिलेटेड डिसऑर्डर्स सोसायटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने ‘सर्टिफिकेट इन जेरिऑट्रिक केअर’
‘होम हेल्थ अॅण्ड कोर्स’, ‘मुख्यमंत्री महाआरोग्य काwशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ या योजनेंतर्गत गव्हर्नमेंट रेकग्नाईझ्ड सर्टिफिकेट
‘जेरिऑट्रिक केअर एड’, ‘मुख्यमंत्री महाआरोग्य काwशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ या योजनेंतर्गत गव्हर्नमेंट रेकग्नाईझ्ड सर्टिफिकेट


























































