दिल्लीतील कॉसमॉस रुग्णालयात भीषण आग, एकाचा मृत्यू; 10 जण जखमी

दिल्लीतील आनंद विहार परिसरातील कॉसमॉस रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 12.12 वाजता कॉसमॉस रुग्णालयात आग लागल्याचा फोन आला. त्यानंतर तात्काळ अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. जखमींपैकी तिघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, अन्य सात जणांना उपचारासाठी आनंद विहार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.