माथेरानमध्ये दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात यश

394

माथेरानच्या इको पॉईंटवर थरार नाट्य घडले. पाय घसरून खोल दरीत पडलेल्या एका पर्यटकाला वाचविण्यात माथेरानच्या पोलिसांना आणि संह्याद्री रेस्क्यू टीमला यश आले आहे. अजित प्रभाकर बर्वे (62)

माथेरानच्या पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या इको पॉईंट पाहण्यासाठी आलेल्या एका पर्यटकांचा पाय घसरला आणि तो खोल दरीत पडला. सुदैवाने तो तीनशे फुट दरीत गवतावर अडकला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सह्याद्री रेस्क्यू टीमच्या साहाय्याने हे बचत कार्य सुरू करून पर्यटकाला दरीतून वर काढले. अजित प्रभाकर बर्वे असे पर्यटकांचे नाव असून ते विलेपार्ले येथे राहणारे आहेत.

अजित बर्वे हे विलेपार्ले येथून माथेरानला पर्यटनास आले होते. सकाळी इको पॉइंटवर फिरण्यास गेले असता त्याचा पाय घसरला व ते खोल दरीत कोसळले. त्याच्यासोबत असलेल्या कुटुंबाने तात्काळ पोलिसांशी संपर्क करून घडलेली घटना सांगितली. त्यानंतर रेस्क्यू टीमने खोल दरीत उतरून बर्वे यांना सुखरूप बाहेर काढले. बर्वे याना जास्त दुखापत झाली नसली तरी पायाला मार लागलेला आहे. त्यांना माथेरान येथे रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू असून ते हे सुखरूप आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या