पारदर्शकतेसाठी अन् भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपालाची नियुक्ती करणार, एमसीएची महत्त्वाची बैठक आज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनची आज (मंगळवार) बैठक होणार आहे. यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. एमसीएत कारभारात पारदर्शकता असायला हवी, भ्रष्टाचारापासून दूर राहायला हवे यासाठी लोकपालाच्या नियुक्तीचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

वानखेडे स्टेडियममध्ये म्युझियम
वानखेडे स्टेडियममध्ये म्युझियम बनवण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. यावेळी यावर कोणता निर्णय घेण्यात येतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण प्रत्यक्षात म्युझियम बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्यास तेथे खेळाडूंच्या आठवणी, फोटो, स्मरणिका यांसारख्या महत्त्वाच्या बाबी ठेवण्यात येणार आहेत.

गावसकरांचा गोल्डन ज्युबिली महोत्सव
हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी पहिला कसोटी सामना 1971 साली खेळला होता. 2021 सालामध्ये या गोष्टीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पुढल्या वर्षी होणाऱ्या सुनील गावसकरांच्या गोल्डन ज्युबिली सेलिब्रेशनचा आराखडाही यावेळी तयार येण्याची शक्यता आहे.

सदस्यांसाठी बीकेसीच्या मेंबरशिपचा प्रस्ताव
एमसीएच्या सलंग्न सदस्यांसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट यावेळी करण्यात येण्याची शक्यता आहे. बीकेसीतील शरद पवार इनडोअर अॅकॅडमी व रिक्रीएशन सेंटरची मेंबरशिप देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दाखवल्यास प्रत्येक संलग्न क्लबच्या एका मेंबरला याची सुविधा घेता येणार आहे.

अंकित चव्हाणला दिलासा मिळणार…
– या बैठकीत अंकित चव्हाणला दिलासा मिळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. आयपीएलमधील फिक्स्ािंगमुळे बंदीची शिक्षा भोगत असलेल्या अंकित चव्हाण याने आपल्यावरील बंदीचा पुर्निवचार करावा अशा प्रकारचा ई मेल एमसीएला पाठवला होता. यावर या बैठकीत विचार होईल. तसेच गेल्या वर्षी झालेली निवडणूक बराच काळ रेंगाळल्यामुळे एमसीएची र्वािषक सर्वसाधारण बैठकच पार पडलेली नाही, इतर व्यवहारही पुढे सरकलेले नाहीत. त्यामुळे बैठकीच्या आयोजनासाठीही पाऊल उचलण्यात येईल.