पक्षावर माझी निष्ठा, प्राण घेतला तरी चालेल! चंद्रकांत पाटलांसमोर मेधा कुलकर्णी भावूक

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना यावेळी भाजपने संधी न देण्याचे ठरवले आहे. त्यांच्याऐवजी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला पुण्यात ब्राह्मण महासंघ तसेच कोथरूडकरांनी कडाडून विरोध केला आहे. परंतु आता खुद्द मेधा कुलकर्णीं यांनीच चंद्रकांत पाटील यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दिला आहे. मेळाव्यामध्ये बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तराळले. यावेळी गिरीष बापट यांनी त्यांची पाठही थोपटली.

girish-bapat

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘माझी पक्षावर निष्ठा आहे. माझ्याबद्दल कुठल्याही वावड्या उठवलेल्या चालणार नाही. मला खंजीर खुपसला तरी चालेल. माझा प्राण घेतला तरी चालेल. भाजपचा विजय होणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच मी कोणत्या संघटनेने काय भूमिका घेतली आहे, काय वावड्या उठवल्या याच्याशी मी सहमत नाही.’

पुणेकर मला परका समजणार नाहीत – चंद्रकांत पाटील

त्या पुढे म्हणाल्या की, थोडं दुःख होऊ शकते. मीही माणूस आहे. मी राजकारणात असले तरी मला संवेदना आणि भावना आहेत. एक स्त्री म्हणून पुरुषाप्रमाणे मला कठोर होता येत नाही. त्यावेळी मी भावना व्यक्त केली. चंद्रकांत पाटलांना उद्देशून त्या म्हणाल्या, ‘मी जेव्हा भाजपच्या कामाला सुरुवात केली तेव्हा माझी मुले तान्ही होती. मी त्यांना घरात सोडून काम केले. मला माहिती त्यांनी त्यांचे वाढदिवस कसे साजरे केले. मला माहित नाही ते कधी आजारी पडले आणि बरे झाले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोणी नेले हेही मला माहिती नाही. मी त्यांच्या शिक्षणावर लक्ष देऊ शकले नाही. मी केवळ माझा वॉर्ड आणि मतदारसंघ यासाठी काम केले.’ यावेळी मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटलांना आपल्या घरीही येण्याचं आमंत्रण दिले.

मेधा कुलकर्णींना ‘या’ दोन पक्षांनी दिली उमेदवारीची ऑफर

चंद्रकांत पाटलांच्या या मेळाव्याला कसब्याच्या उमेदवार मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, मुरलीधर मोहोळ हेही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या