अयोध्या प्रकरणात ‘मध्यस्थी’ची नियुक्ती निरर्थक – सुब्रमण्यम स्वामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
subramanian-swamy

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी समितीचा पर्याय सुचवला. मात्र या प्रकरणातील एक पक्षकार असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी मध्यस्थीची नियुक्ती निरर्थक असल्याचे म्हणत मध्यस्थीसाठी नाव देणार नाही, असे स्पष्ट केले. मध्यस्थीतून काही निष्पन्न होणार नाही असे सुब्रमण्य स्वामी यांनी स्पष्ट केले.

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्या. बोबडे यांनी मध्यस्थी समितीच्या मदतीने चर्चेतून हा प्रश्न सोडवण्यात यावा असा पर्याय समोर ठेवला. यावेळी मध्यस्थी एकटा नसेल तर मध्यस्थींची समिती असेल ती सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत काम करेल, असे सांगण्यात आले. मात्र मध्यस्थीसाठी पब्लिक नोटीस द्यावी लागेल आणि हा प्रश्नावरचा निकाल लांबेल, असा युक्तीवाद हिंदू महासभेकडून करण्यात आला. मात्र त्यानंतर देखील निकाल राखून ठेवताना सर्व पक्षकारांनी आजच मध्यस्थांची नावे द्या, कारण निकाल उशीर करायचा नाही असे रंजन गोगोई यांनी सांगितले. मात्र हा पर्याय आम्हाला मान्य नसून आपण मध्यस्थीसाठी कोणेतेही नाव सूचवणार नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले.