आदित्य ठाकरेंच्या हस्ते वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विद्यमाने वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते या शिबिराचा उदघाटन सोहळा ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक व आदि उपस्थित होते. या शिबिरांतर्गत मुख्यत्वे आदिवासी भागातील रुग्णांना विशेष तज्ज्ञांची विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज्यातील आदिवासी भागातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी 16 जिल्ह्यांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आरोग्य तपासणी, वैद्यकीय चाचण्या, मोफत औषधे व उपचार, आवश्यक शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा यांचा समावेश असणार आहे.