हळदीनंतर आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली ती बाहेर आलीच नाही, लग्न घरात पसरला शोक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तरप्रदेशातील मेरठ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे लग्नाला अवघे 48 तास बाकी असताना महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनने लग्नघरात शोक पसरला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मेरठच्या सरधना येथे राहणारी गिता तालियान मुजफ्पर नगरमध्ये कॉन्स्टेबल होती. गिताचे लग्न ठरले होते आणि मंगळवारी तिची वरात येणार होती. मात्र लग्नाला अवघे 48 तास बाकी असताना गीताचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

गीता तालियानच्या नातेवाईकांना तिच्या मृत्यूमागचे कारणच कळले नाही. लग्नाला अवघे 48 तास शिल्लक असताना संशयास्पद अवस्थेत तिचा मृत्यू झाला. झालं असं होतं की, हळद लावल्यानंतर नववधू आंघोळीसाठी गेली होती. मात्र त्यानंतर ती जीवंत बाहेर आलीच नाही. गीता बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली होती, तिला डॉक्टरकडे नेले असता ती मृत असल्याचे समोर आले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.