आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

10

सामना ऑनलाईन । मुंबई

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आलेला असताना तमाम मुंबईकर बाप्पाच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची योजना आखत आहेत. रविवार हा सुट्टीचा वार असला तरी आज असलेल्या मेगाब्लॉकमुळे गर्दीचा सामना मुंबईकरांना करावा लागू शकतो. कारण, मध्य, हार्बर, पश्चिम मार्गावर आज सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत कल्याणहून सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ पर्यंत सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल कल्याण आणि ठाण्यापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर या लोकल पुन्हा ठाणे ते सीएसएमटीपर्यंत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकात थांबतील.

सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल सकाळी१०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात सकाळी१०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत थांबतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीकडे येजा करणाऱ्या लोकल सकाळी११ ते सायं. ५ पर्यंत सुमारे अर्धा तास उशीराने येतील.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी सकाळी११ ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक आहे. सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल मार्गावर सकाळी१०.३४ ते दुपारी ३.३९ पर्यंत आणि पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटीपर्यंत सकाळी१०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत सेवा खंडित राहणार आहे. या कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी ते पनवेलपर्यंत विशेष लोकल चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये जलद मार्गावर सकाळी१०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक आहे. त्या कालावधीत काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.

summary- mega block in all three routes of mumbai local railway

आपली प्रतिक्रिया द्या