सोलापूरात दर आठवडय़ाला ‘मेगा वॅक्सिनेशन डे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्यात फक्त सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात दर आठवडय़ाला ‘मेगा वॅक्सिनेशन डे’ म्हणजेच ‘लसीकरणाचा महामेळावा’ ही योजना राबवली जाणार आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागातील उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली. यातून 15 मार्चपर्यंत फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.

सोलापूरमध्ये फ्रंटलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचारी असे एकूण 2500 जणांना लसीकरण केले जात होते. आता ‘मेगा वॅक्सिनेशन डे’अंतर्गत 7500 जणांना लसीकरण केले जाणार आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 15 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.

अजूनही 17 हजार आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून कंचित आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एकूण 31 हजार 993 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे ध्येय आहे. 20 फ्रेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. फ्रंटलाइन वर्करमध्ये महसूल कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी, ग्रामपंचायतमधील कर्मचारी, शिक्षक आदीचा समावेश आहे.