मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

रेल्वेच्या प्रवाशांसाठी रविवार हा ‘हाल’वार झाला आहे. दर रविवारी रेल्वेकडून घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. आजही रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी साडे दहापासून या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान या दोन्ही मार्गांवरील काही रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेवर कल्याण ठाणे दरम्यान अप दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी साडे दहा ते साडे चार पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात ठाकुर्ली, मुंब्रा, कळवा, कोपर या स्थानकांवरील लोकलसेवा बंद राहणार आहे.

हार्बर मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी साडे दहा ते चार पर्यंत घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमध्ये या स्थानकांदरम्यानची लोकल सेवा पूर्णत: बंद राहणार आहे. या दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला व वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्यांच्या तिकीट व पासांवर मध्य व ट्रान्स हार्बरने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.