
ईशान्येकडील राज्यांमध्ये काम करणाऱया ‘माय होम इंडिया’ या सामाजिक संस्थेचा ‘वन इंडिया’ पुरस्कार मेघालयचे प्रसिद्ध लेखक एस. कोशियंट सुमेर यांना जाहीर झाला आहे. 29 डिसेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी मंदिर, दादर येथे सायंकाळी 4 ते 7 यावेळेत पुरस्कार सोहळा होणार आहे.
एस. कोशियंट सुमेर हे लेखक, कवी, गायक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी जैंतिया, खासी आणि इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत. त्यांना मेघालय सरकारच्या साहित्य पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ईशान्य हिंदुस्थानात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीला दरवर्षी वन इंडिया म्हणजे ‘वन नॉर्थ ईस्ट इंडिया’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
पुरस्काराचे यंदाचे 11 वे वर्ष आहे. माय होम इंडिया ही संस्था ईशान्येकडील राज्यांना उर्वरित हिंदुस्थानसोबत जोडून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे काम करते. तसेच ईशान्येकडील नागरिकांना शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत मदत करते.


























































