जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तातडीने राजीनामा दिला आहे. मेहबुबा यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपुर्द केला असून सायंकाळी चार वाजता पीडीपीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती पत्रकार परिषद घेणार आहेत.

दरम्यान, भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पीडीपीचे प्रवक्ते रफी अहमद मीर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘भाजपसोबत मिळून आम्ही योग्य प्रकारे सरकार चालवण्याचा प्रयत्न केला. भाजप सत्तेतून बाहेर पडत आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे. याबाबत आम्हाला कोणतेही संकेत देण्यात आले नाही’, असे पीडीपीचे प्रवक्ते रफी अहमद मीर यांनी म्हटले आहे.