देश संविधाना नुसार नाही तर भाजपच्या अजेंड्या नुसार चालतोय, मेहबूबा मुफ्ती यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीडीपी अध्यक्षा व जम्मू काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा कलम 370 वरून भाजप वर टिका केली आहे. देश सध्या संविधानानुसार चालत नसून भाजपच्या अंजेड्या नुसार चालवला जातोय. त्यामुळे देशात हिंदू मुस्लिमातील सौख्य बिघडवले जातेय, अशी टीका मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.

जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटविण्यात आल्या नंतर तेथील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यांनतर बऱ्याच महिन्या नंतर या नेत्यांना नजरकैदेतून काढण्यात आले. मात्र या नेत्यांनी एकत्र येत भाजप विरोधात मोर्चा खोलला आहे . जम्मू काश्मीर मध्ये कलम 370 पुन्हा लागू व्हावे या साठी हे नेते एकत्र आले आहेत.

उद्या या गुप्तकार गटाची पुन्हा बैठक होणार आहे. या बाबत बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, ” मी येथील जनतेला विश्वास देते की कलम 370 पुन्हा लागू होणार. ते स्वत: हे कलम पुन्हा लागू करणार. इतकच नाही तर हात जोडून आपल्याला विचारतील की अजुन काही हवं आहे का? तेव्हा त्यांना यापेक्षा जास्तच द्यावे लागले. चोरीचा मामला पचत नाही’, अशी टीका मुफ्ती यांनी केली आहे.

चौदा महिन्यांच्या तुरुंगवासानंतर मुक्तता झालेल्या जम्मृ-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या राजकीय हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. जम्मू-कश्मीरला 370 कलम हटवण्यापूर्वीचे दिवस पुन्हा मिळवून देण्यासाठी आकाशपाताळ एक करीन असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच हिंदुस्थानचा तिरंगा मानणार नाही अशीही धमकी दिली आहे.