कलम 370 वरून मेहबुबांचा शहांना ‘शह’, पुन्हा अतिशय वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी वादग्रस्त वक्तव्याचा सपाटाच लावला आहे. जम्म-कश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या कलम 370 वरून मेहबुबा मुफ्ती यांनी प्रचारसभांमधून रान उठवले आहे. संविधानातील अनुच्छेद 370 रद्द केल्यास हिंदुस्थान फक्त जबरदस्तीने जम्म-कश्मीरवर कब्जा करू शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे.

अमित शहां आणि केंद्रातील भाजप सरकारला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘अमित शहा साहेब, मेहबुबा मुफ्ती तुम्हाला छातीठोकपणे सांगतेय की ज्या दिवसी तुम्ही संविधानातील अनुच्छेद 370 रद्द कराल त्या दिवशी जम्मू-कश्मीरवर हिंदुस्थानचा कब्जा राहील. ज्या प्रकारे पॅलेस्टाईनवर इस्त्राईलचा कब्जा आहे, त्याचप्रमाणे जम्मू-कश्मीरवर हिंदुस्थानचा फक्त कब्जा राहील.’

याआधी बुधवारी निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर एका रॅलीली संबोधित करताना मेहबुबा मुफ्ती यांनी कलम 370 आणि 35 ए वरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कलम 370 रद्द करण्याबाबतची डेडलाइन तयार करत असतील, तर जम्मू-कश्मीरच्या जनतेचीही डेडलाइन तयार आहे. 370 कलम रद्द होताच कश्मीरचे हिंदुस्थानशी असलेले नाते संपुष्टात येईल. ज्या अटींवर कश्मीर हिंदुस्थानात समाविष्ट झाला आहे, त्याच अटी-शर्ती काढून घेतल्या जात असतील तर आम्ही हिंदुस्थानशी असलेले आमचे नाते तोडून टाकू, असा इशारा त्यांनी दिला.