
३ हजार कोटी पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचे हिंदुस्थानात प्रत्यार्पण करता येऊ शकते, असा निकाल अँटवर्प न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला चोक्सीने ३० ऑक्टोबरला बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे चोक्सीचे प्रत्यार्पण लांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. १७ ऑक्टोबर रोजी अँटवर्प अपील न्यायालयाच्या चार सदस्यीय खंडपीठाने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन केले. न्यायालयाने मे २०१८ आणि जून २०२१ मध्ये मुंबई विशेष न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट लागू करण्यायोग्य असल्याचे घोषित केले, त्यामुळे मेहुल चोक्सीच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला. १३,००० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याला हिंदुस्थानात प्रत्यार्पण केल्यास निष्पक्ष खटला नाकारला जाणार नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारची गैरवर्तनाची शिक्षा दिली जाणार नाही, असेही अपील न्यायालयाने म्हटले होते.
            
		





































    
    




















