ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला; दोन ठार

29

सामना ऑनलाई । मेलबर्न

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात आज पहाटे दहशतवादी हल्ला झाला. एका टॅक्सीत बसलेल्या हल्लेखोराने तीन परदेशी नागरिकांना चाकूने भोकसत कार पेटवून दिली. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

व्हिक्टोरियाचे मुख्य पोलीस आयुक्त ग्राहम एश्टन यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराने परदेशी नागरिकांवर केलेल्या या हल्ल्याकडे आम्ही दहशतवादी हल्ला म्हणूनच पाहत असून त्या दिशेनेच तपास सुरू आहे. सुरुवातीला टॅक्सीला आग लागल्याचा सर्वांचा समज झाला. त्याबाबतची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले तेव्हा चाकू हातात घेतलेला हल्लेखोर धावत असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात मृत्यू पावल्याचेही त्यांनी सांगितले. या भ्याड हल्ल्यापुढे देश कधीच झुकणार नसल्याचे मत ऑस्टेलियाचे पंतप्रधान स्कॉट मैरिसन व्यक्त केले.

दरम्यान ऑस्टेलिया, इराक आणि अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेटविरोधातील अमेरिकी लढाईला जे सहकार्य करत आहेत त्याला मेलबर्नमध्ये आम्ही आज चोख उत्तर दिल्याचे इस्लामिक स्टेटने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या