
अमरावतीतील मेळघाटातील धारणी तालुक्यात असलेल्या मोखा शेतशिवारात वीज कोसळल्यामुळे एका आदिवासी शेतकर्यासह त्याचे दोन बैल ठार झाले.
गेल्या दोन दिवसात अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे. अशातच आज सुध्दा मेळघाटातील धारणी तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरु होता. दुपारी 1 वाजण्याच्या सुमार शेतात काम करीत असलेले शंकर साबुलाल दहीकर यांच्या आंगावर वीज कोसळली. दहीकर हे शेतीचे काम करीत असतांनाच वीज कोसळली. यात दहीकर व त्यांच्यासोबत असलेले दोन बैल जागीत ठार झाले आहे.



























































