
एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे जग आजकाल खूप वेगाने प्रगती करत आहे. मेटा, गुगल आणि ओपनएआय सारख्या मोठ्या कंपन्या आता अशा तरुणांच्या शोधात आहेत जे या तंत्रज्ञानाला नवीन उंचीवर नेऊ शकतील. त्यामुळे फेसबुकची मूळ कंपनी मेटाने मोठ्या पगाराची ऑफर आणली आहे. ही ऑफर 2200 कोटी रुपयांची आहे. या ऑफरमुळे तंत्रज्ञानाच्या जगात खळबळ उडाली आहे.
एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळणे म्हणजे नशिब बलवत्तर म्हणावे लागेल. मेटाने 2200 कोटी रुपयांची ही ऑफर एका तरुणाला दिली. मात्र, इतक्या पगाराची नोकरी मिळूनही त्या तरुणाने ती ऑफर स्वीकारली नाही. AI रिसर्चर Matt Deitke असे या तरुणाचे नाव आहे. मॅट डायटकला फक्त 24 व्या वर्षात 1089 कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. पण त्याने ही ऑफर न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी स्वत: त्याची भेट घेतली. ऑफरमध्ये वाढ करत त्याला सुमारे 2196 कोटी रुपयांची नवी ऑफर दिली. यानंतर मॅटने ती ऑफर स्वीकारली.
AI चा वापर करून कार्यक्षमता वाढवा, सुंदर पिचाई यांचे गूगलच्या कर्मचाऱ्यांना आवाहन
कोण आहे Matt Deitke?
मॅट डायटक हा एआय क्षेत्रातील सर्वांत लोकप्रिय आणि हुशार व्यक्तींपैकी एक असल्याचे मानले जात आहे. मॅट डायटक वॉशिंग्टन विद्यापीठात पीएचडीचा विद्यार्थी होता. मात्र, एआय प्रगतीचा पाठपुरावा करण्यासाठी त्याने शिक्षण सोडले. आणि स्वतःचा एआय संशोधन संघ तयार केला. त्याचे मोल्मो आणि व्हर्सेप्ट हे प्रकल्प खूप लोकप्रिय आहेत. मॅटने खूप लहान वयातच एआय संशोधनात स्वतःचे नाव कमावले आहे. मॅट डायटकच्या या अभ्यासू आणि बौद्धिक क्षमतेला पारखूनच मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्याला एवढी मोठी ऑफर दिली.