मुंबईसह कोकणात पावसाचा जोर ओसरला; विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह कोकणात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस बसरला होता. आता मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर ओसरत असून आता मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागपूर आणि विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून बहुतांश भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज खात्याने वर्तविला आहे.

मुंबईसह कोकणात पावसाचा जोर ओसरला असल्याने काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारी अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात विजांचा कडकडाट होणार असून नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.