न्यूयॉर्कमध्ये ब्रिजला मेक्सिकन नौदलाच्या जहाजाची धडक; दोघांचा मृत्यू

मेक्सिकन नौदलाचे भलेमोठे जहाज शनिवारी ब्रुकलिन ब्रिजला धडकल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी ही माहिती दिली. आइसलँडच्या दौऱयासाठी न्यूयॉर्कहून निघालेल्या मेक्सिकन नौदलाच्या जहाजाला अपघात झाल्याने क्रू मेंबर्स जखमी झाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओतून अपघाताचे गांभीर्य लक्षात येते. कुआहटेमोक नावाचे हे जहाज पुलाच्या दिशेने वेगाने जात असल्याचे पाहायला मिळते. जहाजाचा वरचा भाग पुलाला धडकल्याने जहाजाचे नुकसान झाले.