
सामना ऑनलाईन । मॅक्सिको
‘मी टू’च्या आरोपानंतर स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध रॉकस्टार अर्मांडो वेगा गिल यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने संगीत विश्वात खळबळ उडाली आहे. मी अपराधी नाही म्हणूनच स्कतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी आत्महत्या करत आहे, असे गिल यांच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलेले आहे. ते 64 कर्षांचे होते.
Me Too Mexican Musicians मोहिमेअंतर्गत एका अज्ञात महिलेने अर्मांडो केगा गिल यांच्याकर लैंगिक गैरकर्तणुकीचे आरोप केले. ती 13 कर्षांची असताना अर्मांडो यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला. आरोपानंतर अर्मांडो यांनी घरात आत्महत्या केली. ‘संबंधित महिलेने माझ्यावर जे आरोप केले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. मी दोषी आहे किंवा मी या प्रकरणात अपराधी आहे म्हणून मी आत्महत्या करत नाही. मी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलाला भविष्यात या चुकीच्या आरोपांमुळे त्रास होऊ नये म्हणून मी स्वतःचं जीवन संपवत आहे’ असे अर्मांडो यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हे पत्र त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केले. मुलाला कोणताही नाहक त्रास सहन करावा लागू नये याची चिंता अर्मांडो यांना सतावत होती म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे.
























































