
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मालवणी, गोरेगाव, पवई, चारकोप येथील 150 दुकानांच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या ई-लिलावात शिल्लक राहिलेल्या गोरेगावच्या बिंबिसार नगरमधील 14 कोटी रुपये किमतीच्या दुकानाचाही यात समावेश असणार आहे. दुकानासाठी म्हाडाने निश्चित केलेल्या बोलीपेक्षा अधिक बोली लावणाऱया अर्जदाराला दुकानाचे वितरण करण्यात येणार आहे. म्हाडाने गेल्या वर्षी 173 दुकानांच्या ई-लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यातील 61 दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला होता. अनेकांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाले होते. काही दुकानांवर असलेल्या आरक्षणामुळे त्यांची विक्री झाली नव्हती. त्यामुळे आरक्षणात बदल करता येईल का, यादृष्टीनेदेखील म्हाडाचे प्रयत्न सुरू आहेत.



























































