अभ्युदय नगरचा पुनर्विकास मार्गी लागणार, म्हाडाने तांत्रिक निविदा उघडल्या, तीन कंपन्यांमध्ये चुरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. ‘बांधकाम व विकास’ या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी म्हाडाने मागविलेल्या तांत्रिक निविदा उघडल्या असून पुनर्विकासासाठी ओबेरॉय रियल्टी, महिंद्रा लाईफस्पेस, एमजीएन अ‍ॅग्रो या तीन कंपन्यांकडून अर्ज आले आहेत. म्हाडाकडून सध्या अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू असून पात्र अर्जदारांची आर्थिक बोली उघडली जाईल. त्यानंतर विकासक नेमण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.