चारकोपमधील हाऊसिंग सोसायटय़ांचे प्रश्न सुटणार, म्हाडा इमारत दुरुस्ती-पुनर्रचना महामंडळाचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील हाऊसिंग ऑपरेटिव्ह सोसायटय़ा आणि रहिवाशांना येणाऱया एन-ए टॅक्स, लीज रेंट, दंडव्याज माफी, सोसायटी ऑफिस, पाणीपुरवठा, सहकार खात्यासंदर्भातील अडचणींचा सामना करावा लागतो. रहिवाशांना येणाऱया या समस्या सोडवण्यासाठी म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना महामंडळाने पुढाकार घेत एका चर्चासत्राचे आयोजन केले होते.

मुंबईतील हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटय़ांच्या समस्या सोडवण्यासाठी चारकोपमधील प्रबोधनकार ठाकरे नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या युनियनने म्हाडाच्या इमारत दुरुस्ती-पुनर्रचना महामंडळाचे चर्चासत्र आयोजित केले. त्याला 190 संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एन-ए टॅक्स, लीज रेंट, दंडव्याज माफी, सोसायटी ऑफिस, पाणीपुरवठा समस्या, सहकार खात्यासंदर्भात अडचणी याबाबत महामंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्यासह उपस्थितांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मनाली चौकीदार, पालिका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेविका शुभदा गुढेकर, विधानसभा संघटक संतोष राणे, उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, राजू खान, शाखाप्रमुख निखिल गुढेकर, काथे आदी उपस्थित