
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे आहे. महाराष्ट्राला एआय हब करण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक आहे. त्यासाठी मुंबई आणि राज्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणुकीचा त्यांचा विचार आहे. यासंदर्भात मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्यात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज मुंबईत बैठक झाली.
मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. यातील सर्वात मोठी गुंतवणूक ही महाराष्ट्रात करण्याला प्राधान्य देण्याचे आश्वासन सत्या नडेला यांनी दिले आहे. जिओ कन्व्हेशन सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीला मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता उपस्थित होते.
जागतिक क्षमता केंद्र उभारणार
ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे जागतिक क्षमता केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पातून 15,000 थेट आणि 30, 000 अप्रत्यक्ष असे एकूण 45,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.































































