हैदराबादच्या दीप्तीची जबरदस्त कामगिरी; मायक्रोसॉफ्टकडून दोन कोटी पॅकेजची नोकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबाद येथील सॉफ्टवेयर इंजिनियर दीप्ती नारकुटी हिला मायक्रोसॉफ्ट कंपनीने वार्षिक दोन कोटी पॅकेजच्या नोकरीची ऑफर दिली आहे. दीप्तीला मायक्रोसॉफ्ट कंपनीत सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट इंजिनियर, ग्रेड-2ची नोकरी मिळाली आहे. ती आता अमेरिकेतील सिएटलमध्ये असलेल्या मुख्यालयात काम करेल.

दीप्तीने फ्लोरिडा विद्यापीठातून कम्प्युटर मास्टर्स केले आहे. या विद्यापीठाच्या 300 विद्यार्थ्यांना मॉयक्रोसॉफ्टने नोकरी दिली आहे. त्यात दीप्तीचा समावेश आहे. मात्र त्यात सर्वात मोठे पॅकेज दीप्तीला मिळाले आहे. कॅम्पस प्लेसमेंटमधील तिची मुलाखत प्रभावित ठरली. मायक्रोसॉफ्टशिवाय दीप्तीला गोल्डमॅन सॅक आणि अॅमेझॉनकडून जॉब ऑफर आली. परंतु तिने मायक्रोसॉफ्टला पसंती दिली.