
बिहारमध्ये कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे मत लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) खासदार चिराग पासवान यांनी केले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही ही गोष्ट माहीत आहे. नितीश कुमार यांच्यावर आघाडीतील पक्षांचा दबाव आहे. घटक पक्ष त्यांच्यावर सतत दबाव आणत राहतात. अशा स्थितीत बिहारमध्ये केव्हाही मध्यावधी निवडणुकांची स्थिती निर्माण होऊ शकते. असे मत चिराग यांनी व्यक्त केले.
चिराग पासवान म्हणाले की, “जेव्हा कोणी मुख्यमंत्र्यांकडे रोजगार मागण्यासाठी जातो तेव्हा त्याच्यावर लाठीमार केला जातो. नितीश कुमार गेली 18 वर्षे मुख्यमंत्री आहेत. पण तरीही त्यांना फक्त घोषणा करायच्या आहेत. 20 लाख नोकऱ्यांची चर्चा होती. नितीश कुमार यांचे शब्द आता केवळ घोषणेपुरते मर्यादित राहिले आहेत. बिहारच्या जनतेचा त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही.”