
जीएमबीए आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब आयोजित मोतीराम, उल्लाल आणि कांजी कप आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धेत एमआयजी क्रिकेट क्लब आणि सीसीआय ए संघांनी दमदार सुरुवात केली. मंगरीश पालेकर आणि ऋतुराज राठोड यांच्या नेतृत्वाखालील एमआयजी संघाने एनएससीआय बी संघाचा 3-0 असा पराभव केला आणि त्यानंतर ठाकूर स्पोर्ट्स क्लब संघाला त्याच फरकाने हरवले. तसेच निगेल डी’सा आणि सिद्धेश आरोस्कर सारख्या प्रतिष्ठत खेळाडूंचा समावेश असलेल्या सीसीआय ए संघाने एनएससीआय ए संघाचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर पीएम हिंदू बाथ संघावर 2-1 अशी मात केली.