इचलकरंजी, शिरोळमध्ये गोरगरिबांना दूधवाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, इचलकरंजी

इचलकरंजीसह शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी दूध गरिबांना वाटून दिले पण दूध डेअरीमध्ये दिले नाही. शेतकऱ्यांच्या घरामध्ये रोज संकलन होणारे दूध जोपर्यंत दूध दरवाढ प्रश्नाचा निर्णय होत नाही तोपर्यंत तर दूध गरीब जनतेमध्ये दान करू, पण दूध डेअरीमध्ये देणार नाही असा निर्धार शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी केला. तर याचा निर्णय जर तात्काळ झाला नाही तर राज्यातील सर्वसामान्य जनतेला दुधापासून वंचित राहावे लागेल, त्यामुळे सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.