
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कळ नीधी मय्यम (MNM) पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कडक शब्दांत सुनावले आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानला दिलेल्या धमकीवजा सूचनेनंतर हासन यांनी ट्रम्प यांना “तुमच्या कामाशी काम ठेवा” (Mind your own business) असे खडेबोल सुनावले आहेत.
नुकतेच अमेरिकेने हिंदुस्थानी तेल कंपन्यांना रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत जाहीर केली होती. अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींनी असेही म्हटले होते की, हिंदुस्थान हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असून भविष्यात नवी दिल्ली अमेरिकेकडून तेलाची खरेदी वाढवेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अमेरिकेच्या या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना कमल हासन यांनी हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा उचलून धरला.
कमल हासन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर ट्रम्प यांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, “आम्ही हिंदुस्थानी लोक एका स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राचे नागरिक आहोत. दूरवरच्या परकीय किनाऱ्यावरून येणारे आदेश पाळण्याचे दिवस आता संपले आहेत. कृपया तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या स्वतःच्या कामाशी काम ठेवा. दोन सार्वभौम राष्ट्रांमधील परस्पर आदर हाच जागतिक शांततेचा पाया असू शकतो.”
To
The President of the United States of America @POTUSDear Mr. President,
We, the people of India, belong to a free and sovereign nation. We no longer take orders from distant foreign shores.
Please mind your own business to the best of your abilities.
Mutual respect…
— Kamal Haasan (@ikamalhaasan) March 7, 2026





























































