Mini Lockdown; ‘या’ राज्यात आता प्रत्येक आठवड्यात दोन दिवस असणार लॉकडाऊन

1376

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आता प्रत्येक आठवड्यात दोन दिवस लॉकडाऊन (Mini Lockdown) करण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्यात पाच दिवस कार्यालये आणि बाजारपेठा सुरू राहतील, असा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारने घेतला आहे. शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत प्रत्येक आठवड्यात लॉकडाऊन राहणार आहे.

55 तासांच्या या बंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तसेच या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांना नियम बनविण्यास सूट देण्यात आली आहे. ते बाजाराविषयी नियम बनवू शकतात. कोरोनासंदर्भात कोविड -19 व्यवस्थापन टीम -११ तील अधिकाऱ्यांच्या झालेल्या आढावा बैठकीत यावर सहमती झाल्याचे समजते आहे. याचा संसर्ग होण्यावर परिणाम होतो की नाही हे पाहण्यासाठी सरकारने हा प्रयोग केला आहे. यामुळे संक्रमित रूग्णांची संख्या कमी झाल्यास तर ही व्यवस्था पुढे ही राबविण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या