
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील मराठवाडा, पश्चिम किदर्भ, खान्देश आणि पुणे विभागातील 15 जिल्ह्यांत भीषण दुष्काळ आहे. या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी एसटीच्या चालक आणि वाहक पदांच्या 4242 रिक्त पदांच्या मेगाभरतीची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केली. मराठा समाजासाठी असलेले 16 टक्के आरक्षणही या भरतीत लागू असणार असून या पदांची जाहिरात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत एसटीच्या चालक-काहक पदांच्या मेगाभरतीविषयी माहिती दिली. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एसटी महामंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे असे स्पष्ट करतानाच या वर्षी जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त 15 जिल्ह्यांतील युवकांना रोजगार मिळावा यासाठी चालक व वाहक पदाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे रावते यांनी सांगितले. त्यानुसार दुष्काळग्रस्त संभाजीनागर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशीव, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या 15 जिल्ह्यांत ही नोकरभरती केली जाणार आहे.
बीड, लातूर, धाराशीव, नांदेडमध्ये रिक्त पदे नाहीत
दुष्काळग्रस्त सभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशीव, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या 15 जिल्ह्यांपैकी 11 जिह्यांत 4242 पदांच्या रिक्त जागा आहेत. बीड, लातूर, धाराशीव आणि नांदेडमध्ये चालक व वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत, परंतु तेथील दुष्काळाची परिस्थिती पाहता त्यांनाही या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र पात्र उमेदकारांना 11 जिल्ह्यांतील रिक्त जागी नियुक्ती केली जाईल. भविष्यात या चार जिल्ह्यांत जेव्हा जागा रिक्त होतील तेव्हा त्यांना त्यांच्या जिह्यांत बदली केली जाईल, असे रावते यांनी सांगितले.
परीक्षा शुल्कात 50 टक्के सवलत
दुष्काळग्रस्त भागातील तरुणांसाठी एसटीची मेगाभरती होत आहे. त्यामुळे चालक व वाहक पदासाठी अर्ज करणाऱया मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना परीक्षा शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा दिवाकर रावते यांनी केली.
संभाजीनगर स्मार्ट सिटी : कंत्राटी 560 पदे भरणार
संभाजीनगर शहराची स्मार्ट सिटीत निवड करण्यात आली आहे. संभाजीनगर स्मार्ट सिटीअंतर्गत राबविण्यात येणाऱया या शहरात वाहतूक सुविधेची जबाबदारी एसटी महामंडळाने घेतली आहे. त्यासाठी या काहतूक योजनेत 5 कर्षांसाठी 560 कंत्राटी पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी 15 हजार रुपये वेतन दिले जाणार असून वार्षिक 500 पयांची वाढ केली जाणार आहे. पाच वर्षांनंतर चालक व काहकांना सेवेत कायम केले जाणार असल्याचे राकते यांनी स्पष्ट केले.
शिवशाहीचे अपघात टाळण्यासाठी चालकांना ट्रेनिंग
आतापर्यंत शिवशाहीचे 252 अपघात झाले. यातील बहुतांशी अपघात हे अन्य वाहनांनी केलेल्या ओव्हरटेकमुळे झाले आहेत. यामध्ये 20 ते 22 टक्के अपघात हे चालकांच्या चुकीमुळे तर इतर अपघात छोटय़ा-मोठय़ा वाहनांबरोबरच नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे झाले. एसटीच्या तुलनेत शिवशाही बसची लांबी जास्त आहे. त्यामुळे या बस चालविण्यासाठी चालकांना ट्रेनिंग दिले जात आहे. एसटी चालविण्यासाठी 5 ते 15 वर्षांच्या अनुभव असणाऱया चालकांना हे ट्रेनिंग दिले जाईल, असे रावते म्हणाले.































































